Ad will apear here
Next
संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा जन्मदिन

जन्म. १२ मे १९३० औरंगाबाद येथे
आज इक्बाल कुरेशी म्हटले, की सर्वप्रथम आठवतो तो १९६४चा चित्रपट ‘चा चा चा!’ अभिनेता चंद्रशेखर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक होता. चित्रपट तसा खास नव्हता, पण ‘एक चमेली के मंडवे तले...’ आणि ‘सुबह न आयी, श्याम न आयी...’ ही गीते आजही आवर्जून ऐकावीत अशी आहेत. आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी इक्बाल कुरेशींनी दिलेल्या संगीतात ही गीते अप्रतिमरीत्या गायली आहेत. 

इक्बाल कुरेशी यांचा कल पहिल्यापासूनच भारतीय संगीताकडे होता. त्यामुळे औरंगाबादच्या रेडिओ स्टेशनवरील लहान मुलांच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश होऊ शकला होता; पण पुढे तारुण्यात प्रवेश केल्यावर ते काही काळ निराशावादी विचारांचे बनले होते. 

तथापि एकदा रेडिओ स्टेशनच्या अधिकाऱ्यांची व त्यांची ‘आकाशवाणी’च्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर भेट झाली असता त्यांनी बोलता बोलता एक गाणे तेथेच त्या अधिकाऱ्यांना गाऊन दाखवले. ते ऐकून त्या अधिकाऱ्यांनी त्यांना ‘आकाशवाणी’वरून गाण्याची संधी दिली. परंतु कुरेशी त्यावर खूश नव्हते. त्यामुळे अल्प काळातच ते तेथून हैदराबादला गेले. तेथे त्यांनी फाइन आर्ट अकादमीत नोकरी स्वीकारली. 

आपल्या गाण्याचा व संगीताचा षौक कायम ठेवला.नंतर ते मुंबईत आल्यावर अभिनेत्री नर्गिस यांनी त्यांचे संगीत व काही गैरफिल्मी गज़ला ऐकून काही चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांशी त्यांची भेट घडवून आणली. त्यामधूनच त्यांना ‘पंचायत’ या चित्रपटास स्वतंत्ररीत्या संगीत देण्याची संधी मिळाली. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाकरिता कुरेशींनी ‘ता थैया करते आना.. ’ हे गीत संगीतबद्ध केले आणि ते लता मंगेशकर व गीता दत्त यांच्याकडून गाऊन घेण्याचे ठरवले; पण त्या काळात लता मंगेशकर नवीन संगीतकारांकडे सहजासहजी गात नसत! 

इक्बाल कुरेशींचा तर तो पहिलाच चित्रपट होता. त्या वेळी नर्गिस यांच्या सांगण्यावरून लता मंगेशकर गायला तयार झाल्या! आणि ते गीत लोकांना खूप आवडले. या चित्रपटाकरिता कुरेशी यांनी दहा गीते तयार केली होती. परंतु त्यातील ‘मैं यह सोचकर उस के दर से उठा था...’ हे कैफी आझमी यांनी लिहिलेले गीत चित्रपट प्रदर्शित होत असताना वगळण्यात आले होते. तेच गीत पुढे १९६४मध्ये ‘हकीकत’ चित्रपटात घेण्यात आले व तेथे मदनमोहन यांनी ते संगीतबद्ध केले होते. 

इक्बाल कुरेशींनी कोणत्याही संगीतकाराकडे सहायक म्हणून काम केले नव्हते. १९५८पासून त्यांची चित्रपटसृष्टीतील संगीतकार म्हणून स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. संगीत या दृष्टीने यशस्वी ठरलेला कुरेशी यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६० चा ‘बिंदिया’ हा चित्रपट होय! या चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय ठरलेले गीत म्हणजे मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘मैं अपने आप से घबरा गया हूँ...!’

१९६० मध्येच अभिनेत्री साधना व अभिनेता जॉय मुखर्जी यांचा नायक-नायिका म्हणून असलेला ‘लव्ह इन सिमला’ हा पहिला चित्रपट पडद्यावर आला. त्यालाही कुरेशी यांनी संगीत दिले होते. यानंतर आलेल्या १९६१च्या ‘उमर कैद’मधील कुरेशी यांच्या संगीतातील मुकेश यांनी गायलेले, ‘मुझे रात दिन ये खयाल है...’ हे गीत आजही श्रवणीय आहे. 

नंतर १९६२मध्ये कुरेशींच्या संगीतातील ‘बनारसी ठग’ हा चित्रपट पडद्यावर आला. यामधील ‘एक बात पूँछता हूँ...’ हे मुकेश आणि उषा मंगेशकर यांनी गायलेले मधुर द्वंदगीत उलेखनीय होतेच; पण त्याशिवाय या चित्रपटातील मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘आज मौसम की मस्ती में गाए पवन...’ या गीताची चाल व संगीत सुंदर होते; पण हा ‘बनारसी ठग’ चित्रपट फारसा न चालल्यामुळे त्या गीताचीच चाल पुढे कुरेशी यांनी ‘चा चा चा’ चित्रपटाकरिता वापरली आणि ते गीत म्हणजे ‘एक चमेली के मंडवे तले...’ हे खूप लोकप्रिय ठरले. 

पुढील काळात कवाली की रात, सरहदी लुटेरा, मोहब्बत और जंग, दो ठग अशा काही ‘सी ग्रेड’ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. काही भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. संगीतामधून दिसणारा हा संगीतकार आपल्याला १९६३च्या ‘ये दिल किसको दू’ या चित्रपटात पडद्यावरही पाहायला मिळतो. 

शशी कपूर व रागिणी हे या चित्रपटाचे नायक-नायिका होते. या चित्रपटात आशा भोसले आणि मुबारक बेगम यांनी गायलेले ‘हमे दम दई के सौतन घर जाना...’ हे गीत पडद्यावर मराठी अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेत्री मधुमती सादर करतात. हे मुजरा गीत सादर होत असताना जे काही लोक हा मुजरा पाहायला आलेले असतात, त्यांच्यामध्ये इक्बाल कुरेशी आपल्याला बसलेले दिसतात. 

१९६५ नंतर मात्र त्यांनी काही गैरफिल्मी गाणीही गायली. कारण संकोची स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत ते मोठ्या निर्मात्यांकडे गेले नाहीत. चीन आक्रमणाच्या वेळी त्यांनी वीरश्रीचे एक गैरफिल्मी गीत संगीतबद्ध केले होते. ते लोकांना आवडले; पण ते गीत त्या काळापुरतेच उत्तम ठरले. 

१९७१ ते १९८० या काळात त्यांनी काही मुस्लीम धर्मिक व सामाजिक चित्रपटांना संगीत दिले होते. ख्वाजा की दिवानी (१९८१), सौतेला पती (१९८५), बिस्मिल्लाह की बरकत (१९८३), मेरा नसीब (१९८९) जिने की सजा (१९९०), प्यार दो प्यार लो (१९९५) अशा काही चित्रपटांमधून संगीतकार इक्बाल कुरेशी हे नाव वाचण्यात आले होते; पण आता ते चित्रपट व त्यातील गीते विस्मरणात गेली आहेत.

 इक्बाल कुरेशी यांच्या वाट्याला "ब" अथवा "क" दर्जाचे निर्माते व दिग्दर्शक आले. परन्तु त्यातील काही गाणी खूप लोकप्रीय झाली होती. त्यांनी एकूण २८ चित्रपटाना संगीत दिले. इक्बाल कुरेशी यांचे २१ मार्च १९९८ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे इक्बाल कुरेशी यांना आदरांजली.

इक्बाल कुरेशी यांची गाणी

https://www.youtube.com/watch?v=81z-a7IxSHY

संजीव_वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ITKACY
Similar Posts
बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन आज दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक बाबूराव रामजी बागुल यांचा जन्मदिन. जन्म. १७ जुलै १९३० नाशिक येथे. बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे. ‘वेदाआधी तू होतास...वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास...तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही...’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक
रणजितसिंग यांचा स्मृतिदिन आज एका शूर, मुत्सद्दी, युद्धशास्त्रज्ञ, पराक्रमी, शिकारी रणजितसिंग यांचा स्मृतिदिन. जन्म. १३ नोव्हेंबर १७८० पाकिस्तानमध्ये गेलेल्या गुजरानवाला प्रांतात. रणजितसिंग यांचा जन्म संधावालिया घराण्यात महाराजा सुकरचाकीया आणि राणी राज कौर यांच्या पोटी झाला. रणजितसिंग' यांचा एकंदर जीवनकाल ५९ वर्षांचा. वडिल
आज संत नामदेव यांची पुण्यतिथी जन्म. २६ ऑक्टोबर १२७० संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते.
गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन आज आज नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन. जन्म. १९ मे १९३८ माथेरान येथे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language